"अखंड सेवा, सक्षम नागरिक"

आमची यशोगाथा

ममदापूर   – निसर्गाच्या कुशीतलं एक जिवंत चित्र

येवला-नांदगाव  राज्य मार्गाच्या गडद रेषेपासून थोडं पूर्वेकडे वळलं, की तिथं साक्षात निसर्गाचं एक अव्यक्त सुंदर रुप भेटतं ,ममदापूर  गाव. सुमारे ६६३  लोकवस्तीचं हे गाव हरीण व कळवीटसाठी प्रसिद्ध निवांतपणे माळरान  विसावलेलं आहे. गावाचं स्वरूप लहान, पण त्याची ओळख मोठी इथली माणसं, संस्कृती, निसर्ग, सृष्टी आणि श्रम यांचं एक अनोखं संमीलन इथे दिसतं.

धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख
ममदापूर ची एक खासियत म्हणजे एकच ग्रामदैवताचं मंदिर, पण त्यात आहेत  हनुमान मूर्ती . केवळ धर्माच्या नाहीत, तर सामाजिक समभावाच्या प्रतीक आहेत. तसेच गावात बिरोबा महराज मंदिर ,तुकाई माता मंदिर ,संत गोरोबा काका मंदिर आहेत.
इथे अठरा पगड ,बारा बलुतेदार समाज पण दोघेही गुण्यागोविंदानं, आपुलकीनं, एका छताखाली नांदतात. गावात वादाच्या नाही, तर एकोप्याच्या गोष्टी ऐकायला मिळतात.

उत्पन्नाचे स्रोत: श्रमशीलतेचं गाव

गावकऱ्यांची मुख्य जीवनरेखा म्हणजे शेती आणि मोलमजुरी.
गावाचा पूर्ण भाग म्हणजे कमी पर्जन्यमान  मुळे इथे शेती मान्सूनवर अवलंबून आहे. मका ,बाजरी , कांदा,वेलवर्गीय पिकं,  यासारख्या पिकांची हिरवळ नजरेत भरते.तर गावाचा  पूर्व भागत विस्तीर्ण माळरान वन विभाग असून मेळाचा बंधारा सिंचन प्रकल्प काम सुरु आहे.सदर परिसरात हरीण ,कळवीट ,नीलगाय,रानडुक्कर इ.वन्य प्राणी यांचा वावर असतो तसेच मल्हारवाडी वस्ती आहे . पश्चिम भागात लोकवस्ती आहे.ममदापूर तांडा लमाण/बंजारा समाजाची वस्ती  असून संस्कृती जतन केली आहे.शिवनेरी नगर ,इ वस्ती आहे         
       

प्रगतीच्या वाटेवर- ममदापूर 

आधुनिक शेती येतंय, पण परंपरा जपली जातेय. इथं मातीचा गंध आहे, पण त्यात यंत्रांचं सूर मिसळू लागलाय. इथे अठरा पगड ,बारा बलुतेदार असेल पण गावाच्या हृदयात एकच माणुसकी आहे. ममदापूर चं नाव मोठ्या नकाशावर असो वा नसो, पण एक-ना एक दिवस नक्कीच गाव नावा रूपास आणण्याची ग्रामपंचायतचे उत्साही सरपंच,उपसरपंच,ग्रा.प अधिकारी    व सदस्य मंडळ व ग्रामस्थ खुणगाठ मनाशी बाळगून असल्याचे दिसून येत आहे . ग्रामपंचायत ममदापूर, ममदापूर गावाच्या पायथ्याशी वाहते,मातीनाला बंधारा गावाला वळसाघालून सौदर्यात भर घालतो, कधी शांत, कधी खळखळाट करणारे नदी-नाले पावसाळ्यात ही गावाच्या साक्षीने नाचते,  इथली माती म्हणजे गावकऱ्यांचं गर्भसंपन्न बँक खाते. त्यात मोलमजुरीचा घाम, शेतीचा कष्ट आणि भविष्याचं रोपटं रुजवलेलं आहे. आणि हे सगळं सांभाळणारे माणसं प्रेमळ, सहकार्यशील आणि जिद्दी.

प्रशासकीय संरचना


पदाधिकारी


भारतातील पंचायती राज हे ग्रामीण स्थानिक स्वराज्य प्रणालीचे प्रतीक आहे.

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा,,,

लोकसंख्या आकडेवारी


663
3583
1860
1723

Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo